Friday, March 31, 2023

ब्रेड पकोडा (bread pakoda )


 ब्रेड पकोडा :-

साहित्य :-

1) ब्रेड स्लाईस (bread slice ):- 4 

2) बेसन पीठ :- 1 कप

3)कांदा :- 1 (अगदी बारीक चिरलेला )

4)मिरच्या :- 2 ( बारीक चिरलेल्या )

5) कोथिंबीर :- पाव वाटी (बारीक चिरलेली)

6) हळद :- पाव चमचा

7) मीठ चवीनुसार

8) तेल तळण्यासाठी





कृती :- 1) एका bowl मध्ये बेसन पीठ, चिरलेला कांदा, मिरची, कोथिंबीर, हळद व मीठ एकत्र करून mix करून घ्यावे

2) प्रथम थोडं थोडं पाणी घालून च पीठ mix करावे कारण एकदम पाणी घातलं तर गुठळ्या राहण्याचा संभव असतो.. एकदा का पाणी आणि बेसन mix झालं कि त्यात थोडं अजून पाणी घालून मिश्रण पातळसर च करून घ्यायचे, कारण पीठ घट्ट झालं तर पकोडे crispy होत नाहीत.

3) bread ला मधून कापून घेऊन त्रिकोणी किंवा तुम्हांला हवा तो shape द्यावा.

4)एका कढईत तेल गरम करावे, आता हे bread चे तुकडे बेसन च्या बनवलेल्या मिश्रणाने व्यवस्थित cover करून तेलात तळून घ्यावे. साधारण dark सोनेरी रंगावर हे पकोडे तळावेत..

5) आणि झटपट मस्त crispy, tasty पकोडे तयार..


टीप :-  पकोडे तळताना आजूबाजूला मिश्राणाचा जो बारीक चुरा निघतो त्यात लसूण, मिरची पावडर घालून मिक्सर ला लावून एक छान वडापाव सोबत असते तशी चटणी बनवू शकतो..

Wednesday, March 29, 2023

कागदासारख्या पातळ आणि तोंडात टाकताच विरघळणाऱ्या तांदळाच्या पापड्या


साहित्य :-
1)तांदळाचं पीठ :- 1 वाटी
2)मीठ :- चवीनुसार
3) हिरवी मिरची, कोथिंबीर, चिलीफ्लेक्स

1)एका bowl मध्ये एक वाटी तांदळाचं पीठ घेऊन त्यामध्ये 3 वाट्या पाणी घालून mix करावे..
2) एका मोठ्या पातेल्यात 6 वाट्या पाणी घालून गरम करायला ठेवावे.
3) पाण्याला उकळी आली की त्यात तांदळाच्या पिठाचं मिश्रण थोडं थोडं घालून mix करत रहावे व सर्व मिश्रण व पाणी व्यवस्थित एकजीव करावे.




4) चवीनुसार मीठ घालून सतत ढवळत रहावे.
5) साधारण 10-12 mins नंतर मिश्रण छान घट्ट होतं.. (त्यावर glaze येते )
6) गॅस बंद करून हे मिश्रण थंड करावयास ठेवावे.
7) मिश्रण थोडे थंड झाल्यावर त्यामध्ये चिलीफ्लेक्स,2 मिरच्या व कोथिंबीर अगदी बारीक चिरून घालावी व सर्व mix करावे.
8) आता plastic paper वर ह्या मिश्राणाच्या पातळ पातळ पापड्या घालव्यात.व fan खाली रात्रभर सुकू द्याव्यात.
9) दुसऱ्या दिवशी सकाळी पापड्या paper वरून सोडवून घ्याव्यात व एक दिवस उन्हात वाळवाव्यात...


Saturday, March 25, 2023

Skin whitening orange peel soap संत्र्याच्या सालीच्या powder चा fairness soap



 

1)संत्र्याच्या सालीची powder
2(Goat milk soap base
3(Coconut oil




Soap base च्या block मधुन आपल्याला हवा तेवढा तुकडा काढून घ्यावा
त्याचे छोटे छोटे तुकडे करून एका भांड्यात घेऊन double boiler मध्ये वितळवून घेणे.
Soap base पूर्ण वितळल्यावर त्यामध्ये संत्र्याच्या सालीची powder व थोडंसं coconut oil mix करून मिश्रण एकजीव करावं व
Mould मध्ये किंवा स्टील च्या वाटी /paper cups / plastic cups मध्ये set करायला ठेवावे
4-5 तासांनंतर साबण unmould करून घ्यावे..

हे साबण अतिशय सोपे व अतिशय effective आहेत. ह्या साबणाच्या वापराने चेहऱ्यावरचे काळे डाग व सुरकुत्या कमी होऊन चेहरा खूप छान glow करतो..

🌸Youtube link :- 

https://youtu.be/0SU3ME3mTJk

Thursday, March 23, 2023

इमरती (imarti )

इमरती 🌸


उडीद डाळ:- 1 कप
साखर :- 1 ते दीड कप
चिमूटभर खाण्याच्या केशरी रंग.
तळण्यासाठी तूप /तेल

कृती-
सर्वप्रथम उडीद डाळ धुवून 4 -5 तास पाण्यात भिजत ठेवा.पाणी निथळून मिक्सरमध्ये वाटून घ्या

.यामध्ये खाण्याचा केशरी रंग घाला आणि चांगले फेटून घ्या.साखरेचा दीड तारी पाक तयार करा.
आता एका पसरट कढईत तूप/तेल गरम करा. एका प्लास्टिक paper ला मेहंदी कोनाचा आकार देऊन त्यामध्ये डाळीचं मिश्रण भरून गरम तेलात/तुपात गोलाकार इमरती बनवा आणि तळून घ्या.तळल्यावर निथळून इमरती साखरेच्या पाकात घाला आणि थोड्यावेळ त्या पाकात राहू द्या. नंतर पाकातून काढून चविष्ट इमरती सर्व्ह करा.   

youtube link

https://youtu.be/SblDxVIVEf4

Wednesday, March 15, 2023

तुपाच्या बेरीची बर्फी




साहित्य :-
1) तुपाची बेरी :- 2 कप
2)साखर :- 1 कप
3) दूध :- दीड कप
4) वेलचीपूड :- पाव चमचा


तुम्ही खोबरं, मिल्क पावडर, खवा, बेसन, गव्हाचं पीठ, रवा व इतर बरेचसे जिन्नस घालून वेगवेगळे flavour देऊ शकता पण फक्त बेरीची मिठाई च जास्त छान लागते.🙂

कृती :-
1) एका कढईत तुपाची बेरी घालून त्यात दूध व साखर घालून mix करावी. व सतत हलवत रहावे.
2) मिश्रण साधारण घट्ट झालं की वेलची पूड घालून mix करावे.
3) मिश्रण कढईला चिकटणं बंद झालं की एका प्लेट मध्ये काढून घेऊन व्यवस्थित set करून घ्यावं.
4) 10 mins नंतर हव्या त्या आकारात वड्या पाडून घ्याव्या.
5) ह्या मिश्रणात तुम्ही खोबरं, मिल्क पावडर, खवा, बेसन, गव्हाचं पीठ, रवा व इतर बरेचसे जिन्नस घालून वेगवेगळे flavour देऊ शकता पण फक्त बेरीची मिठाई च जास्त छान लागते.

Youtube link :-

https://youtu.be/dqHVC3FO30g

Tuesday, March 7, 2023

चंद्रकला सूर्यकला गुजिया

चंद्रकला suryakala

 चंद्रकला सूर्यकला गुजिया

साहित्य :-

कव्हर :- 

1)मैदा :- 1 कप

2)Food color :- as per your choice



Filling :-

1)मावा, /बर्फी,/पेढा 

2)Dryfruits



थोडक्यात कृती :-

1)प्रथम पीठ मळून घ्यायचं त्याचे तीन गोळे करायचे, एक गोळा plain ठेऊन बाकी दोन मध्ये आवडीप्रमाणे colors घालावे.(मी orange आणि green colors घेतलेत )

2)Plain color च्या पिठाच्या दोन same आकाराच्या पुऱ्या लाटायच्या. एका पुरीवर मधोमध माव्याचे थोडंसे सारण घालून त्यावर दुसरी पुरी ठेऊन दोन्ही पुऱ्या side ने एकत्र दाबून चिटकवायच्या. नंतर सुरीच्या साहाय्याने side ने cut द्यायचे आणि मग ते एक एक करून बोटांच्या चिमटीत पकडून दाबावे म्हणजे त्याला पाकळीचा आकार येतो. 

3)आता orange color च्या पिठाचा अगदी पातळ thread बनवून तो फोटो त दाखवल्या प्रमाणे side ला लावून घ्यायचा. एक green color ची छोटी पुरी बनवून तिला सुरीने 5-6 cut द्यायचे आणि ते cut बोटांच्या चिमटीत पकडून दाबायचे म्हणजे छान फूल तयार होतं हे फूल सूर्यकलेच्या वर लावून त्यात लवंग खोचायची आणि तुपात तळून घायचे व नंतर पाकातून बुडवून काढायचे (जास्त गोड नको असल्यास ही step skip करावी )... आणि सुंदर सूर्यकला तयार.. 🌞

Veg अंडा करी ( eggless egg curry )

  Eggless Veg अंडा करी potato paneer अंडा curry बिना अंड्याची अंडा करी #vegandacurry 🌹   साहित्य :- 1) उकडलेले बटाटे 2) पनीर 3) basic ...