Friday, April 28, 2023

गोड शेव,जत्रेतली लाल शेव (गाठी ) (sweet gathiya )

 जत्रेतली लाल शेव (गाठी )🌹मीठे सेव🌹 sweet gathiya 







साहित्य :-

1) बेसन पीठ (chickpea flour):- 1 cup

2) गूळ (jaggery) :- 1 to 3/4 cup

3) वेलची powder (cardamom powder): 1/4 tsp

4) food color - red/orange 


1 कप बेसन पीठ घेऊन त्यात एक चमचा तुपाचं मोहन घालून पीठात थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यावं...10mins rest ला ठेऊन पिठाचा गोळा घेऊन हाताने त्याचा पातळ roll बनवायचा.. ह्या roll चे सुरीने छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि तेलात /तुपात सोनेरी रंगावर तळायचे ... एका पॅन मध्ये गूळ वितळवून घ्यायचा त्यात वेलची पूड व orange / red food color घालायचा ..आणि ही तळलेली शेव घालून कोरडे होईपर्यंत mix करत राहायचं..10 mins नंतर थंड झाल्यावर separate करायचे... मस्त खुसखुशीत tasty लाल गोड शेव तयार...



Friday, April 21, 2023

बटाटा साबुदाणा sticks आणि चकल्या (sago potato sticks )





साहित्य :-
1) बटाटे :- 1/2 kg
2) साबुदाणे :- 1/2 kg
3) जिरे, मीठ चवीनुसार
4) बारीक चिरलेली मिरची :- 4-5 / तिखटाच्या taste नुसार

प्रथम आदल्या रात्री साबुदाणे 3-4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून त्यात थोडं वर येईल इतकं पाणी घालून भिजत ठेवावे.
दुसऱ्या दिवशी पाण्यातून काढून चाळणी वर निथळत ठेवावे (कमीत कमी 2 तास तरी )
बटाटे उकडून साले काढून घ्यावीत व किसून घ्यावीत... ह्या किसलेल्या बटाट्यामध्ये साबुदाणे, जिरे, मीठ, व मिरची घालून एकजीव करावे.व अर्धा तास rest ला ठेवावे.
अर्ध्या तासांनंतर हे मिश्रण प्लॅस्टिक च्या जाड बॅग मध्ये भरून मेहंदी च्या कोनाप्रमाणे hole कापून घ्यावा.
व प्लॅस्टिक paper वर sticks आणि चकल्या पाडाव्यात. अगदी easy पडतात चकल्या.
नंतर हे sticks आणि चकल्या 3-4 दिवस कडक उम्हात सुकवून घ्याव्यात...

Sunday, April 9, 2023

मलई आईस्क्रिम - मलई कुल्फी (Malai icecream -Malai kulfi ))

 


❤️मलाई आईस्क्रिम फक्त दुधापासून - नो मिल्कपावडर नो मावा 🌹Roll cut malai icecream just with milk

🌸साहित्य :-
1)दूध (milk ):- 1 कप (250ml)
2)साखर (sugar ):- पाव कप ( or as per your sweet taste )
3) कॉर्नफ्लोअर (cornflour ):- 1/2  tsp
4) वेलची पावडर



1)प्रथम एका पॅन मध्ये साखरेचं caramel तयार करावं व त्यात दूध घालून mix करावं
2)थोड्या दुधात कॉर्नफ्लोअर mix करून ते दूध वरील दुधात घालून mix करावे
3) हे मिश्रण गॅसवर ठेऊन अटवावे
4) 5-7 mins नंतर मिश्रण घट्ट होतं.
5) हे मिश्रण थंड करावं व नंतर साच्यांमध्ये भरावं व freezer मध्ये ठेवावं.
6) 4-5 तासांमध्ये छान मऊ आणि स्वादिष्ट आईस्क्रिम तयार होते.
7) moulds  मधून बाहेर काढून आईस्क्रिम dryfruits ने garnish करावी..

8) अगदी smooth आणि tasty मलई आईस्क्रिम तयार

Saturday, April 1, 2023

तांदळाचे फ्रायम्स ❤️ rice fryums





Rice fryums (तांदळाचे फ्रायम्स )

तांदळाचे पीठ :- 1 वाटी
चवीनुसार मीठ
food color :- आवडीनुसार (optional )



1)प्रथम एका bowl मध्ये 3 कप तांदळाचे पीठ व 3 कप पाणी घालून mix करावे
2)एका मोठ्या भांड्यात 6 कप पाणी गरम करावे व त्यामध्ये हे तांदळाच्या पिठाचे मिश्रण हळू हळू  mix करत सोडावे.मिश्रण continuous हलवत रहावे. (नाहीतर तळाला लागतं मिश्रण )
3)साधारण 10 -12 mins शिजू द्यावे. थोडे थंड झाल्यावर हवं असेल तर मिश्रणातून थोडं थोडं मिश्रण बाजूला काढून त्यात colors घालून mix करावेत.





4)मेहंदी साठी बनवतो तसे plastic paper चे कोन बनवून त्यामध्ये हे शिजवलेलं पीठ भरून कोन rubberband ने बंद करून घ्यावा.
5)एका plastic paper वर ह्या कोनाने हव्या त्या आकाराचे गोल, चौकोनी, फुले , पाने draw करावे.
व फॅन खाली सुकू द्यावे.. नंतर plastc वरून सोडवून घ्यावेत व एखाद दिवस उन्हात वाळवावेत.

🌸 तळलेल्या फ्रायम्स वर थोडासा चाट मसाला, थोडी आमचूर पावडर व पिठीसाखर भुरभूरावी, एकदम tasty लागतात 👍

Veg अंडा करी ( eggless egg curry )

  Eggless Veg अंडा करी potato paneer अंडा curry बिना अंड्याची अंडा करी #vegandacurry 🌹   साहित्य :- 1) उकडलेले बटाटे 2) पनीर 3) basic ...