Friday, April 21, 2023

बटाटा साबुदाणा sticks आणि चकल्या (sago potato sticks )





साहित्य :-
1) बटाटे :- 1/2 kg
2) साबुदाणे :- 1/2 kg
3) जिरे, मीठ चवीनुसार
4) बारीक चिरलेली मिरची :- 4-5 / तिखटाच्या taste नुसार

प्रथम आदल्या रात्री साबुदाणे 3-4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून त्यात थोडं वर येईल इतकं पाणी घालून भिजत ठेवावे.
दुसऱ्या दिवशी पाण्यातून काढून चाळणी वर निथळत ठेवावे (कमीत कमी 2 तास तरी )
बटाटे उकडून साले काढून घ्यावीत व किसून घ्यावीत... ह्या किसलेल्या बटाट्यामध्ये साबुदाणे, जिरे, मीठ, व मिरची घालून एकजीव करावे.व अर्धा तास rest ला ठेवावे.
अर्ध्या तासांनंतर हे मिश्रण प्लॅस्टिक च्या जाड बॅग मध्ये भरून मेहंदी च्या कोनाप्रमाणे hole कापून घ्यावा.
व प्लॅस्टिक paper वर sticks आणि चकल्या पाडाव्यात. अगदी easy पडतात चकल्या.
नंतर हे sticks आणि चकल्या 3-4 दिवस कडक उम्हात सुकवून घ्याव्यात...

No comments:

Post a Comment

Veg अंडा करी ( eggless egg curry )

  Eggless Veg अंडा करी potato paneer अंडा curry बिना अंड्याची अंडा करी #vegandacurry 🌹   साहित्य :- 1) उकडलेले बटाटे 2) पनीर 3) basic ...